Call +(91)-2161-286555, 286333      English | मराठी

GREEN POWER SUGARS LTD.

सामाजिक बांधिलकी

गोपुज गावासाठी 24x7 पाणी पुरवठा योजना -

  • ग्रीन पॉवर शुगर्स लि., यांच्या वतीने सामाजिक बांधीलकी म्हणुन गोपुज गावासाठी 24x7 पिण्याच्या पाण्याची योजना सुरु केलेली आहे.
  • या पाणी पुरवठा योजनेतुन 400 कनेक्शन मधुन गोपुज गावातील 400 कुटुंबाना स्वच्छ व आरोग्यदायी पाणी पुरवठा केलेला आहे.
  • या पाणी पुरवठा योजनेसाठी ग्रीन पॉवर शुगर्स लि., ने 1 कोटी रुपये खर्च केलेले आहेत.

उरमोडी उपसा सिंचन -

ग्रीन पॉवर शुगर्स लि,गोपूज ता.खटाव,जि.सातारा.या प्रकल्पाची दुष्काळी भागात सन 2014 साली उभारणी करणेत आली आहे. सदर संस्थेस जवळपास खात्रीशीर पाणी पुरवठा उदभ्वल नसलेमुळे हिंगणगाव-बुll ल.पा तलावामधुन 14 कि.मी. अंतरावरुन पाण्याची व्यवस्था करणेत आलेली आहे. कारखाना परीसर दुष्काळी पट्टयात असुन या भागातुन उरमोडी उपसा सिंचन प्रकल्पाचा खटाव कालवा जात आहे.सदर प्रकल्प विद्युत बीलामुळे शासनास चालवणे अडचणीचे झालेले असुन तो बंद पडणेच्या मार्गावर होता. परंतु सामाजीक बांधीलकी व दुष्काळ निवारणासाठी आमच्या कारखान्यामार्फत उरमोडी प्रकल्पाचे पाणी दुष्काळी भागास मिळणेसाठी दि: 09/02/2016 रोजी धनादेश क्र. 001834 व दि: 23/12/2016 रोजी दुसरा धनादेश क्र.0021567 असे एकुण रु. 100 लक्ष अगाऊ रक्कम शासनाकडे वर्ग करण्यात आली आहे. तेंव्हापासुन दुष्काळी भागामधील टंचाई दुर होऊन ऊस निर्मीती झालेली आहे.त्यामुळे शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे राहणीमान उंचावले आहे.

तसेच आमचे कारखान्याने स्वखर्चाने टेंभू जोड कालवा क्र 2 वरील मायनार क्र 2 चे 2 कि.मी.लांबीचे खोदकाम करुन तोंडोली गावचे 300 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणलेले आहे.

तसेच सद्या मौजे ढाणेवाडी, कान्हरवाडी व नेवरी इत्यादी गावे टेंभु योजनेच्या लाभक्षेत्रापासुन वंच्छीत असणा-या क्षेत्रासाठी कारखान्यामार्फत ठिंबक सिंचन प्रकल्प राबवण्याचे नियोजन करणेत येत आहे.

ढाणेवाडी, खेराडे-वांगी, नेवरी पाणी पुरवठा योजना -

मौजे ढाणेवाडी,खेराडेवांगी,नेवरी,ता.कडेगांव जि.सांगली पाणी पुरवठा योजना हि जीवन प्राधीकरण विभाग सांगली यांचेमार्फत हिंगणगाव बु ल.पा. तलावातुन कार्यरत करणेत आली होती. सदर योजना जि.प. सांगली यांचेकडे हस्तांतरीत करणेत आली आहे. हि योजना हिंगणगाव बु. ल.पा. तलावातुन ढाणेवाडी, नेवरी इत्यादी गावांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी करणेत आली असुन सध्या ती बरेच दिवसापासुन बंद आहे. म्हणून आमचे मार्फत जि.प.सांगली यांचेकडे हि योजना कार्यान्वीत करणेसाठी भाडेतत्वावर मिळणेबाबत प्रस्ताव सादर करणेत आलेला आहे. त्यास मंजूरी मिळाली असुन वरील गावचे पिण्याचे पाणी व अंदाजे 1000 हे. क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा प्रस्ताव करुन हि योजना लवकरच कार्यान्वीत करणेत येत आहे.

वडलाईदेवी पाणी पुरवठा योजना -

सर्वसाधारणपणे कडेगांव तहसील विभाग टेंभु प्रकल्पाच्या लाभक्षेत्राने बहुतांशी व्यापलेला आहे. कडेगांव तहसीलचे क्षेत्र डोंगराळ चढ उताराचे असलेमुळे जवळच्या परिसरातील गांवचे क्षेत्र टेंभु प्रकल्पाचे लाभक्षेत्रामधील सिंचनापासुन वंच्छीत राहीलेले आहे. मौजे कडेगांव, कडेपुर, हिंगणगाव खुII गावचे एकुण 2247 हे. क्षेत्र टेंभु उपसा सिंचन प्रकल्पापासुन वंच्छीत राहीले होते. सदर क्षेत्रासाठी आमचे कारखान्यामार्फत वडलाईदेवी पाणी वापर संस्था स्थापन करुन वरील क्षेत्र सिंचनाखाली घेणेसाठी प्रकल्प तयार केलेला आहे. सदर प्रकल्पाची अंदाजपत्रकीय रक्क्म रु 18.45 कोटी झालेली आहे. शिवाजीनगर तलाव हा टेंभु योजनेचा संतुलन तलाव असुन तो कडेगांवच्या पश्चिमेस उंचावर आहे. त्या तलावाखाली चेंबर बांधला आहे. तलावातील पाणी उजव्या कालव्याचे गेटमधुन चेंबरमध्ये घेऊन गुरूत्वाकर्षन दाबाने बंदीस्त पाईपद्वारे वरील क्षेत्र सिंचनाखाली घेण्यात आले आहे. ठिक ठिकाणी चेंबर बांधुन बंदीस्त पाईपद्वारे 2247 हे. क्षेत्र सिंचनाखाली आणन्याचे काम सध्या प्रगतीपथावर असुन डिसेंबर 2017 अखेर योजना कार्यान्वीत होणार आहे.