Call +(91)-2161-286555, 286333      English | मराठी

GREEN POWER SUGARS LTD.

ऊस विकास

कारखान्याचा साखर उतारा योग्य राहण्यासाठी शेती व ऊस विभागाकडुन उदिष्टयांची पुर्तता खालील प्रमाणे -

 • हंगामनिहाय व जातनिहाय ऊसाची लागण करुन घेण्यात येत आहे.
 • कारखाना कार्यक्षेत्रात साखर उतारा चांगला मिळण्याच्या दृष्टीने लवकर पक्व होण्या-या व जास्त साखर उतारा असणा-या ऊस जातीची लागवड करुन घेण्यात येत आहे.
 • कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस क्षेत्राचा योग्य साखर उतारा मिळण्याकरता ऊस तोडणी कार्यक्रम काटेकोरपणे राबवण्यात येत आहे.
 • जास्त साखर उतारा मिळण्याकरता लागण व खोडवा ते (60% व 40%) या प्रमाणे ऊस गळीतास आणल्यामुळे साखर उतारा वाढण्यास मदत झाली आहे.
 • ऊस तोडणी कार्यक्रम साखर उतारा बेस प्रमाणे राबविण्यात येत आहे.
 • ऊस तोडणी कार्यक्रमामध्ये आडसाली लागणी बरोबर आडसाली खोडवा ऊस तोडणेत येत आहे.

लागण हंगाम 2016-17 करिता ऊस लागण खालीलप्रमाणे करुन घेतल्याने साखर उतार-यात गळीत हंगाम 2017-18 मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसुन येईल.

ऊसाचे हेक्टरी उत्पन्न वाढीसाठी -

 • कारखाना कार्यक्षेत्रामध्ये ऊस विकास योजने अंतर्गत आडसाली लागण मोठ्या प्रमाणावरती होणे करीता शेतक-यांच्या बाधांवर जाऊन मार्गदशन केले जाते व गाववार / गटवार मेळावे घेतले जातात.
 • कारखाना कार्यक्षेत्रामध्ये ऊस विकास योजने अंतर्गत शेतक-यांना हिरवळीचे खत, सेंद्रिय खत, बेसल डोस, पायाभुत व प्रमाणित बेणे पुरवठा केला जातो.
 • कारखाना कार्यक्षेत्रामध्ये ऊस विकास योजने अंतर्गत नेटाफिम, कोठारी, जैन या कंपन्यांचे ठिबक सिंचन संच ऊस उत्पादक शेतक-यांना ऊस पिक वाढीसाठी देत आहोत.

ऊस हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे नगदी पिक आहे. गेल्या अर्ध शतकामध्ये साखर कारखानदारीमध्ये ग्रामीण महाराष्ट्राचा कृषी ,औद्योगिक,सामाजीक आणि शैक्षणिक विकास झाला आहे. या पिका खालील क्षेत्रामध्ये अवर्षण काळ वगळता प्रत्येक वर्षी वाढ होत असून सरासरी उत्पादन मात्र समाधान कारक नाही.कारण यापीकाची शेती आधुनिक तंत्राचा वापर करुन केली जात नाही.

जमिनीची पूर्वमशागत:-

ऊस पिक 12 ते 18 महिने शेतात उभे रहात असल्याने पिकाच्या जोमदार वाढीसाठी, पिकाची मुळे खोलवर जाणे व पसरणे आवश्यक आहे. जमिनीत ऊस पिकाची मुळे खोलवर जावी, त्यांनी कार्यक्षमतेने अन्न व पाणी शोषून घ्यावे यासाठी पूर्वमशागत महत्वाची आहे. ऊस लागवडीपर्यंत जमिनीची करावी लागणारी मशागत यालाच “पूर्वमशागत” असे म्हणतात. यामध्ये खालील कामांचा समावेश होतो.

लागण हंगाम:-

हंगामनिहाय ऊस लागवड योग्य कालावधीत झाल्यास उत्पादनात वाढ होते. थंडीच्या कालावधीत झाल्यास उत्पादनात वाढ होते. थंडीच्या कालावधीत व अति तापमान असताना ऊस लागण करणे टाळावे अन्यथा कमी उगवण, खोड कीडीचा प्रादुर्भाव कमी फुटवे या बाबींना सामोरे जावे लागते.

बेणे निवड:-

 • बेणे मळयातील बेणे वापरावे व तीन ते चार वर्षातून एकदा बेणे बदल करावा.
 • उसाचे बेणे जाड, रसरशीत, सशक्त व जोमदार असावे.
 • बेण्याचे वय 9 ते 11 महिने असावे.
 • डोळयांची वाढ पुर्ण व फुगीर डोळे असावेत.
 • डोळा जुन व निस्तेज नसावा.
 • बेणे रोग व कीडमुक्त असावे.

बेणे प्रक्रिया :-

बेणे लागण करण्यापूर्वी तयार केलेल्या दोन अथवा एक डोळयांच्या टिप-या कार्बेन्डाझीम (उदा.बाविस्टीन/जेकेस्टीन) 250 ग्रॅ. आणि इमेडाक्लोप्रिड 90 ग्रॅम 250 लि. पाण्याच्या द्रावणात मिसळून 10 ते 15 मिनिटे बुडवून लावाव्यात. यामुळे मुळकूज,कांडीकूज,पायनॅपल यासारखे रोग व खवले कीड,पीठे कीड या सारख्या कीडींचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यानंतर द्रवरुप ॲसिटोबॅक्टर जीवाणू खत 2.5 लि. 250 लि.पाण्याच्या द्रावणात मिसळुन टिपरी 15 ते 20 मि.बुडवून घ्यावी, त्यामुळे ऊस पिकास द्यावा लागणा-या नत्र खताच्या मात्रेमध्ये 50 % बचत करता येते.

बाळ बांधणी:-

लागणीनंतर दीड ते दोन महिन्यांनी बाळ बांधणी करावी. फुटवे दिसायला लागल्यानंतर बाळ बांधनी बैल औजार किंवा मजुरांच्या सहाय्याने बेडगी अथवा कुदळीने करावी. ऊसाच्या फुटव्याला 7.5 ते 10 सें.मी माती लावावी.

 • फुटव्यांना मातीची भर लागल्याने फुटवे जोमाने वाढतात.
 • रासायनिक खताचा दुसरा हप्ता (नत्र) माती आड होतो.
 • खोड कीडीचे नियंत्रण होते तसेच तणांचा बंदोबस्त होतो. पिक साडेतीन महिन्याचे होईपर्यंत दातेरी कोळपे एक महिन्याच्या अंतराने चालवून जमीन भुसभुशीत ठेवावी. सरी मुजणार नाही याची काळजी घ्यावी.

मोठी बांधणी:-

लागण ऊस पिक 3.5 ते 4 महिन्याचे झाल्यानंतर रासायनिक खताचा शेवटचा हप्ता द्यावा व नांगराने वरंबे फोडून घ्यावेत. नंतर दातेरी कुळव चालवून जमीन भुसभुशीत करावी व रिजरच्या सहाय्याने बांधणी करुन घ्यावी. यामध्ये वरंब्याची सरी होते व सरीचा वरंबा होतो.

 • रासायनिक खताचा शेवटचा हप्ता मातीआड होतो.
 • नवीन मुळांची वाढ चांगली होते,ऊस लोळत नाही, पाणी व्यवस्थित देता येते.
 • जमिनीत हवा खेळती राहाते तसेच फुटव्यांची संख्या मर्यादित राखली जाते.

आंतरपीकाचे फायदे:-

 • मुख्य पिकाव्यतिरिक्त आंतरपीकाचे बोनस उत्पन्न मिळते.
 • जमिनीचा ओलावा पुरेपुर वापरला जातो.
 • तणांचा बंदोबस्त करण्यास मदत होते.
 • बांधणीच्या वेळी आंतरपीकाचा पालापाचोळा गाडावा, सेंद्रिय खत म्हणूनही वापर होतो.

हंगामानुसार ऊसातील आंतरपीके:-

 • आडसाली:-भुईमुग, सोयाबीन, मूग, उडीद, पालक, शेपू, कोंथिबीर, मेथी, कांदा रोप, ताग, धैंचा.
 • पूर्व हंगाम:- कोबी, फुलकोबी, नवलकोल, कांदा, बटाटा, लसूण, हरभरा, गहू, ताग, धैंचा, पालक, शेपू, कोथिंबीर, मेथी, शुगरबीट.
 • सुरु:- भुईमुग, सोयाबीन, पालक,गवार,ताग,धैंचा, काकडी, भाजीपालावर्गीय पिके.