Call +(91)-2161-286555, 286333      English | मराठी

GREEN POWER SUGARS LTD.

बायो कंपोस्ट

रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा कस कमी होतो. जर रासायनिक खते प्रमाणापेक्षा जास्त मातीत मिसळली तर मातीचे नैसर्गिक घटक असंतुलीत होवुन जमिनीच्या कसावर त्याचा विपरित परिणाम होतो.

जैव कंपोस्ट खत / नैसर्गिक खताचा वापर यावरती एक चांगला उपाय होवु शकतो “ग्रीन समृध्दी” मध्ये NPK ( नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम) तसेच नैसर्गिक कर्ब यांचा भरपुर प्रमाणात समावेश आहे.

ग्रीन समृध्दी -

साखर उत्पादन प्रक्रियेमधुन जो अवषेश उरतो तो प्रेसमड आणि मद्यार्क उत्पादन प्रक्रियेतुन येणारा स्पेंटवॉश योग्य प्रमाणात मिसळुन त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी उपयोग होतो.

कंपनीने साईटजवळ कंपोस्ट खत निर्मितीचा प्लांट स्थापित केला आहे. या खताचे “ग्रीन समृध्दी” या ब्रॅन्डच्या नावाने विपणन केले जाते.

कंपोस्ट खत करण्याची प्रक्रिया -

Composting Process: Churning and turning process with aero tiller.

Spent wash :Auto spraying machine

 • सर्वप्रथम प्रेसमड कंपोस्ट साईटवर टाकला जातो.
 • त्रिकोणकती आकाराच्या ओळी तयार केलेल्या जातात त्यांना विंडो असे म्हणतात.
 • प्रत्येक विंडो वर ठरावीक अंतराने व वेळेने स्पेंटवॉश फवारले जाते.
 • असे विंडो तयार झाल्यानंतर ते खत मिक्सींग मशीन एरोटिलर च्या साह्याने पलटले जाते. यामुळे खतामध्ये एकसमान तापमान आणि ओलावा राहतो.
 • त्यानंतर विंडो वरती मायक्रोबियल कल्चर टाकले जाते. आणि एरोटिलर च्या साह्याने मिसळण्याची प्रक्रिया चालु ठेवली जाते.
 • या कंपोस्टींग प्रक्रियेमध्ये खताचे तापमान 65 ते 70 डिग्री सेलसियस पर्यंत वाढते.
 • तापमान नियंत्रित करुन ते 40 डिग्री सेलसियस पर्यंत ठेवाण्यासाठी त्यावरती पाणी फवारले जाते.
 • त्यातील सुक्ष्म जीव कर्ब तसेच इतर घटकांचे पथ्थकरण करते.
 • विंडोचे खर या सर्व प्रक्रियेमध्ये नियमितपणे तपासले जाते. यामध्ये प्रामुख्याने ओलाव्याचे प्रमाण, PH, कर्ब आणि नत्र याचे प्रमाण तपासले जाते.
 • ही प्रक्रिया साधारणपणे 30 ते 40 दिवस चालते.
 • हे खत तयार झाल्यानंतर ते योग्य प्रमाणात पॅक केले जाते.

ग्रीन समृध्दी चे वैशिष्ट्ये -

Composting Process: Churning and turning process with aero tiller.

Spent wash :Auto spraying machine

 • सेंद्रिय कर्ब - 25 % पेक्षा जास्त
 • कर्ब नत्र प्रमाण - 15 % पेक्षा कमी
 • ओलावा - 30 % पेक्षा कमी
 • नत्र - 0.50 % पेक्षा जास्त
 • स्फुरंद - 2 % पेक्षा जास्त
 • पलाश - 3 % पेक्षा जास्त

ग्रीन समृध्दी वापरण्याचे फायदे -

 • मातीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढवते.
 • मातीची घनता व संरचनेत वाढ करुन मुळांसाठी योग्य वातावरण तयार करते.
 • जमिनीची धुप कमी करते.
 • मातीचा PH स्थिर ठेवते.
 • सुक्ष्म पोषक पदार्थ जमिनीला पुरवते.
 • जमिनीला भरपुर प्रमाणात नैसर्गिक घटक पुरवते.
 • जमिनीचा कस वाढवुन पोषक पदार्थ धरुन ठेवण्याची क्षमता वाढवते.